मुंबई : मुंबईतल्या प्रभादेवी परिसरात शिवसैनिकांनी विशाल पांडे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रीत झालाय. या मारहाणीप्रकरणी दादर पोलिसांनी शिवसेनेच्या प्रभादेवीतल्या शाखाप्रमुख शैलेश माळी, शेखर भगत आणि दिनेश पाटील यांना अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाल पांडे आई आणि तीन भावंडांसह राहतो. काही दिवसांपूर्वी घराला हातभार लावण्यासाठी विशालनं सिद्धिविनायक मंदिरामागे फ्रॅन्कीचा स्टॉल लावला होता. 


मात्र दुसऱ्याच दिवशी काही शिवसैनिकांनी विशालला स्टॉल कसा लावला? असा जाब विचारत स्टॉल तोडला. 


एवढ्यावरच न थांबता शिवसैनिकांनी विशालला बांबुनं मारहाण करत तो राहत असलेल्या इमारतीपर्यंत आणलं. यावेळी विशालला वाचवायला आलेल्या विशालचा भाऊ निखाल पांडेलाही मारहाण केलीय.