मुंबई : राज्यातील राजकारण ढवळून काढणाऱ्या ऍन्टिलिया स्फोटकं प्रकरणात संशयित असलेल्या सचिन वाझेची एनआयएकडून कसून चौकशी सुरू आहे. वाझे वापरत असलेल्या सर्व कारची चौकशी एनआयएकडून सुरू आहे. 
  
सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यांची चौकशी एनआयएकडून सुरू आहे. त्याबाबतीत दररोज नवनविन खुलासे होत आहेत. 
  
सचिन वाझेच्या ताफ्यातली आठव्या गाडीचे सीसीटीव्ही फुटेज झी २४तासच्या हाती लागले आहे. NIA ची टीम वसई विरार भागात याच ऑडिचा तपास करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी २४तासच्या हाती लागलेले हे सीसीटीव्ही फूटेज वांद्रे-वरळी सीलिंक रोडवरचे आहे. याच गाडीतून आपण सचिन वाझेंसोबत गेल्याची माहिती अटक करण्यात आलेला आरोपी विनायक शिंदेनं तपास यंत्रणेला दिली आहे. सर्व षडयंत्राच्या बरोबर २ दिवसांपूर्वीचं हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं सांगण्यात येत आहे.