मुंबई : मुंबई आणि उपनगरात सुरु असलेल्या पावसामुळे मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्य़ा उशिराने धावत आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या देखील मुंबईत उशिराने येत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे लोकल वाहतूक उशिराने धावत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेवरील वाहतून 10 ते 15 मिनिटं आणि हार्बर मार्गावरील वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहेत. तसेच आज अनेक लांब पल्ल्य़ाच्या गाड्या देखील जवळपास एक तास उशिराने मुंबईत दाखल होत आहेत. कालपासूनच मुंबई आणि उपनगरात पाऊस वाढला आहे. पण अजून कुठे ही ट्रॅकवर पाणी साचलं नाही.