मुंबई : आधार - पॅन कार्डबाबत एक चांगली बातमी. पॅन कार्ड क्रमांक आधारसोबत लिंक करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने मुदतवाढ केल्याचे जाहीर केले आहे. आता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत पॅन कार्ड-आधार लिंक करता येणार आहे. याआधी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपणार होती, ती आता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे. सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने जाहीर केले आहे. याबाबत आज सीबीडीटीने एक परिपत्रक काढले आहे.



आजही काही नागरिकांनी आपले पॅन आणि आधार क्रमांक नव्या मुदतीपर्यंत जोडले नाही तर ते चालू स्थितीत राहणार नाहीत. त्यामुळे याच्या मदतीने होणारे आर्थिक व्यवहार त्यांना करता येणार नाहीत, असे सीबीडीटीने स्पष्ट केले आहे.


पॅन आणि आधार क्रमांक प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावरुन किंवा एसएमएसच्या सहाय्याने लिंक करता येणार आहे. मात्र, हे क्रमांक जोडताना नाव आणि जन्मतारीख चुकीची असणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.