मुंबई : Railway Platform ticket : रेल्वे प्रशासनाने सणासुदीच्या मुहूर्तांमुळे मुंबई विभागातील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. आजपासून पुढील आदेशापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल स्थानकांवर  प्लॅटफॉर्म तिकिटे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Central Railway increased platform ticket to avoid Covid infection in mumbai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तथापि, सणासुदीच्या काळात प्लॅटफॉर्म,स्टेशन आणि टर्मिनसवर जास्त गर्दी रोखण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल स्थानकांवर पुढील सुचनेपर्यंत 50 रुपयांप्रमाणे प्लॅटफॉर्म तिकीट दिले जाईल. ही तिकीटवाढ पाच पटीने असल्याचे दिसून येत आहे.


सध्या निर्बंध शिथिल केले जात असले तरी कोरोना संसर्ग नव्याने वाढू नये म्हणून रेल्वे मंत्रालयाने ही नवी शक्कल लढवली आहे. रेल्वे विभागाने रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटात तब्बल पाच पटीने वाढ केली आहे. लोकांनी विनाकारण रेल्वेस्थानकात गर्दी करु नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रेल्वे स्थानकाच्या परिसरात विनामास्क फिरल्यास तब्बल 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.


मुंबईत प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जात आहे. राज्यात मंदिरे तसेच शाळा नुकत्याच सुरु झाल्या आहेत. परंतु निर्बंध शिथिल झाल्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने खरबदारी घेण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही नवी युक्ती शोधली आहे.  यापूर्वी मुंबईत प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर हा 10 रुपये होता. आता नव्या दरांनुसार प्लॅटफॉर्म तिकीट हे 50 रुपये करण्यात आले आहे. हे नवे दर आजपासून लागू होणार आहेत.