महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत येणाऱ्या आंबेडकरी बांधवांसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १२ स्पेशल ट्रेन
मुंबई: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या आंबेडकर अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १२ अनारक्षित फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतलेला आहे. नागपुर ते सीएसएमटी (३ फेऱ्या), सीएसएमटी-दादर ते सेवाग्राम,अजनी,नागपुर (६ फेऱ्या),अजनी ते सीएसएमटी १ फेरी,सोलापूर ते सीएसएमटी (२ फेऱ्या) धावणार आहेत.
०१२६२ स्पेशल ट्रेन ४ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजुन ५५ मिनिटांनी नागपुरहुन सुटणार असुन सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजुन ३५ मिनिटांनी पोहचणार आहे. ०१२६४ ट्रेन ५ डिसेंबर रोजी नागपुरहुन सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून सीएसएमटीला त्याच रात्री १२ वाजून १० मिनिटांनी पोहचणार आहे. ०१२६६ ट्रेन ५ डिसेंबर रोजी नागपुर हुन दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार असून सीएसटीएमला दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी पोहचणार आहे. या स्पेशल ट्रेनला अजनी, सेवाग्राम, वर्धा, फुलगाव, धामणगाव, बडनेरा,अकोला,मलकापुर,भुसावळ,जळगाव,चाळिसगाव,मनमाड, नाशिक रोड,इगतपुरी, कसारा,कल्याण आणि दादर या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या तिन्ही ट्रेनला जनरल सेकण्ड क्लासचे १६ कोच असणार आहेत.
०१२४९ सीएसएमटी-अजनी ट्रेन ६ डिसेंबरला दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी, ०१२५१ सीएसएमटी-सेवाग्राम ट्रेन ६ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी सुटणार आहे. ०१२५३ दादर-अजनी ट्रेन ७ तारखेला रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी,०१२५५ सीएसएमटी-नागपुर ट्रेन दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे. ८ डिसेंबर रोजी ०१२५७ सीएसएमटी- नागपुर ट्रेन संध्याकाळी ६ वाजून ४०मिनिटांनी आणि ०१२५९ दादर-अजनी ट्रेन रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटणार आहे.
या ट्रेनला दादर, कल्याण, कसारा,ईगतपुरी,नाशिक रोड, मनमाड, चाळिसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापुर, अकोला,बडनेरा, धामणगाव,फुलगाव,वर्धा, सेवाग्राम आणि अजनी या स्थानकांवर थांबा असणार आहे. ०२०४० अजनी-सीएसएमटी सुपरफास्ट ट्रेन ७ तारखेला दुपारी ३ वाजता सुटणार असुन सीएसएमटी दुसºया दिवशी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी पोहचणार आहे.
याशिवाय, ०१३१५ सोलापूर-सीएसएमटी ट्रेन ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुटणार असून सीएसएमटीला रात्री १ वाजून २० मिनिटांनी येणार आहे. ०१३१६ सीएसएमटी -सोलापूर ट्रेन ७ डिसेंबर रोजी रात्री १२वाजून २५ मिनिटांनी सुटणार असून सकाळी १० वाजून १० मिनिटांनी सोलापूरला पोहचणार आहे. या स्पेशल ट्रेनला कुर्डुवाडीदौड,पुणे,लोणावळा,कर्जत,कल्याण आणि दादर या स्थानकांवर थांबा दिला आहे.या गाडीला जनरल सेकण्ड क्लासचे १२ कोच असणार आहेत.
तसेच नियमित धावणाऱ्या काही गाड्यांना जादा कोच जोडण्यात आले आहेत. ५ डिसेंबर रोजी धावणाºया ५११५४ भुसावळ-सीएसएमटी पॅसेंजरला जनरल सेकण्ड क्लासचे२ कोच, ५११५३ सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजरला ७ तारखेला जनरल सेकण्ड क्लासचे २ कोच,१७४१२-११सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेसला ५ आणि ६ तारखेला जनरल सेकण्ड क्लासचा १ कोच जोडण्यात येणार आहे.