मुंबई : Central Railway traffic disrupted : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना याचा फटका बसला आहे. लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. लोकल सेवा सुरळीत झाली तरी अनेक लोकल उशिराने धावत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान वाहतूक सुरू झाली असली तरी सकाळीच प्रवाशांचा खोळंबा झाला. बदलापूरसह सर्व स्टेशन्सवर गर्दी दिसून आली. तासाभराच्या खोळंब्यानंतर लोकल सुरू झाल्यामुळे कल्याण स्टेशनवरही शेकडो प्रवासी ताटकळले होते. अनेक जण जीव धोक्यात घालून विरुद्ध दिशेनं लोकलमध्ये चढताना दिसून आले. 


रेल्वेच्या इंजिनात बिघाड झाल्याने बदलापूर - अंबरनाथ दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली आहे. लातूर - मुंबई एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याचे माहिती मिळत आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. गेल्या एक तासापासून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इंजिनातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.