मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अंबरनाथ, बदलापूर, कर्जकडे जाणारी वाहतूक ठप्प
Mumbai local News : ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत (Central Railway service disrupted) झाल्याने घरी परतणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई : Mumbai local News : ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत (Central Railway service disrupted) झाल्याने घरी परतणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कल्याणजवळ क्रॉसिंग पॉइंटमध्ये बिघाड झाल्याने लोकल वाहतूक ठप्प आहे. अंबरनाथ, बदलापूर, कर्जकडे जाणारी वाहतूक ठप्प असून स्थानकांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. कसारा मार्गावरील वाहतुकीवरही बिघाडाचा परिणाम दिसून येत आहे. (Central Railway traffic disrupted, traffic jammed to Ambernath, Badlapur, Karjat )
कल्याण स्थानकाजवळील क्रॉसिंग पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. कर्जत आणि खोपोलीकडे जाणीर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलसह पुण्याकडे जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
मध्य रेल्वेवरील बिघाड नेमका कशामुळे झाला याचे कारण मिळालेले नाही. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोलीकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्यांचा खोळंबा झाला आहे. रेल्वे स्थानकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.