मुंबई :  मुंबई उपनगरीय लोकल (Mumbai Suburban Railway) रेल्वेच्या दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतो. यामुळे काही तास रेल्वे सेवा ही प्रभावित होते. रविवारी 6 फेब्रुवारी मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या हार्बर मार्गावर (Harbour Railway) मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनो फारच महत्त्वाचं काम असेल तरच आणि ही बातमी वाचूनच रविवारी घराबाहेर पडा. (central railway update mega block on harbor line on Sunday 6 february 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे या स्थानकादरम्यान सकाळी 11 वाजून 40 मिनिटं ते दुपारी 4 वाजून 40 मिनिटांपर्यंत असे. तर चुनाभट्टी आणि  वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.  


सीएसएमटी आणि वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी,बेलापूर, आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या आणि सीएसएमटी इथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे आणि गोरेगावसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मेगा ब्लॉकदरम्यान पनवेल ते कुर्ला प्लॅटफॉर्म नंबर 8 वरुन विशेष रेल्वे सेवा सुरु असतील. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.