मुंबई : मुंबई महानगर पालिेका समिती अध्यक्ष आणि नगरसेवक अमेय घोले यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलाय. पुढील उपचारासाठी त्यांना सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमेय घोले हे गेले ४ महिने बीएमसीच्या सर्व हाँस्पिटल आणि कोविड केअर सेंटर मधील रुग्णांच्या नियोजनात व्यस्त होते. सातत्याने कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात राहील्यामुळे करोनाचा संसर्ग झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची फोनवरुन चौकशी केली. कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्यांना याबद्दलची माहिती दिली. गेल्या ३-४ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी. घाबरुन जाऊ नये असा संदेश त्यांनी पाठवला. 



काही लक्षणं असल्यास आपली चाचणी करून घेण्याचे आवाहनही केले.  तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमाने मी पुन्हा लवकर बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल असेही अमेय घोले म्हणाले.