बाळासाहेबांच्या स्मारकाला न्यायालयात आव्हान
बाळासाहेबांच्या नियोजित स्मारकाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौरांचा बंगला स्मारकासाठी द्यायला तसंच या स्मारकासाठी सरकारतर्फे शंभर कोटीचा निधी द्यायला या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्टीनंतर ५ जूनला कोर्ट सुरू होईल त्यावेळी ही याचिका कोर्टात सुनावणीला येणं अपेक्षित आहे. भगवानजी रयानी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.
मुंबई : बाळासाहेबांच्या नियोजित स्मारकाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौरांचा बंगला स्मारकासाठी द्यायला तसंच या स्मारकासाठी सरकारतर्फे शंभर कोटीचा निधी द्यायला या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्टीनंतर ५ जूनला कोर्ट सुरू होईल त्यावेळी ही याचिका कोर्टात सुनावणीला येणं अपेक्षित आहे. भगवानजी रयानी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.
स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देण्याचा निर्णय नगरविकास विभागाने यापूर्वीच घेतला होता. त्याबाबतची अधिसूचनाही काढली होती. महापौर बंगल्याची जागा पालिकेच्या मालकीची असल्यामुळे ती स्मारक समितीला हस्तांतरित करण्यासाठी सुधार समितीची आणि सभागृहाचीही मंजुरी मिळाली होती. महापौर बंगल्याच्या ११,५५१.०१ चौरस मीटर जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.