देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास, मुंबई : मुंबईतल्या चांदिवली येथील संघर्ष नगर परिसरामध्ये रस्ता खचल्यामुळे शेजारील तीन इमारतींना धोका निर्माण झाला आहे. या इमारती रिकाम्या करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र जोपर्यंत पर्यायी व्यवस्था मिळत नाही तोपर्यंत घरं खाली करणार नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. 'विशनिया कन्स्ट्रक्शन कंपनी'नं केलेल्या खोदकामामुळे हा रस्ता खचल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलीय.  


चांदिवलीत रस्ता खचला

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांदिवली संघर्ष नगर याठिकाणी इमारत क्रमांक १० ही जमिनीमध्ये चार फुटापर्यंत खाली खचली आहे. रात्री अत्यंत मुसळधार पावसामुळे या ठिकाणी जमीन खचली. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पोलिसांकडून इमारतीतील अनेक रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे. परंतु, काही रहिवाशांनी मात्र पर्यायी व्यवस्था मिळेपर्यंत घरं खाली करणार नसल्याचं सांगितलं. प्रशासन व महानगरपालिकेनं मात्र याकडे डोळेझाक केलीय. 


चांदिवलीत रस्ता खचला

नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचं काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. या अगोदरदेखील याच ठिकाणी रस्ता खचल्यानंतर दुर्घटना थोडक्यात टळली होती. बऱ्याच झोपड्या याठिकाणी वसल्या आहेत. तरीदेखील विकसकाने कोणत्याही प्रकारची उपयोजना न करता या ठिकाणच्या नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचं काम केलंय. याला जबाबदार संबंधित अधिकारी विकासकाला पाठिशी घालण्याचं काम करतात आणि विकसक आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या इमारतीच्या इमले वाढवण्यात व्यस्त आहे, असा आरोप इथल्या रहिवाशांनी केलाय. 


चांदिवलीत रस्ता खचला

मागील चार-पाच वर्षांपासून या ठिकाणी 'शापूरजी पालनजी'चा इमारत बांधण्याचे काम चालू आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता खचला आहे. त्याचबरोबर आजूबाजूला सपाटी असल्याने त्या ठिकाणी असून त्याठिकाणी असलेले संघर्ष नगर इमारत क्रमांक १० ही जमिनीमध्ये चार ते पाच फुटापर्यंत खाली खचली गेली आहे. यानंतर बिल्डरांवर अंकुश कुणाचा आणि कसा राहणार? हा प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत.