दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आरक्षण देण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत याबाबतचे निवेदन सादर केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गात अर्ज करता यावेत, यासाठी वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अकरावीत SEBC च्या विद्यार्थ्यांसाठी  १२ टक्क्यांप्रमाणे ३४२५१ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या प्रवर्गात केवळ ४ हजार ३५७ अर्ज आले आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना खुल्या वर्गात अर्ज केल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गात अर्ज केलेल्या मराठा समाजातील (SEBC) विद्यार्थ्यांना आता प्रवर्ग बदलण्याची मुभा देण्यासाठी वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


मराठ्यांच्या एकजुटीचा विजय; हायकोर्टाकडून मराठा आरक्षण कायद्याला सशर्त मंजुरी


अनेक मराठा विद्यार्थ्यांकडे SEBC जातीचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांनी खुल्या प्रवर्गात अर्ज केला असण्याचीही शक्यता आहे. अशा विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून SEBC प्रवर्गात अर्ज करताना जातीच्या प्रमाणपत्राऐवजी पालकांचे हमीपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. हे हमीपत्र प्रवेशाच्या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध आहे. SEBC प्रवर्गात प्रवेश झाल्यानंतर जातीचं प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याचा फायदा अकरावीत प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना होणार आहे.


मराठा कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका- सदावर्ते