मुंबई : १ जानेवारी रोजी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी नियमात काही बदल करण्यात आले आहेत. दर्शनाच्या वेळा सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत,दुपारी 12.30 ते संध्याकाळी 7, रात्री 8 ते 9,  तर दर्शनबंदीची वेळ दुपारी 12 ते 12.30 , नैवेद्याची वेळ, सायं  7 ते 8 (आरतीची वेळ) असणार आहे. कोरोनाचा धोका कायम असताना मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून नियमात बदल करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर्शनासाठी नवे नियम 


१. क्यूआर कोड शिवाय कोणालाही प्रवेश नाही.
२. ऑनलाईन आरक्षण करुन क्यूआर कोड मिळवता येईल.
३. बोले रोडवरील रिद्धी प्रवेशद्वाराने क्यूआर कोड तपासूनच प्रवेश मिळेल.
४. व्हॉट्स अपवरील, क्यू आर कोडची फोटो कॉपी किंवा स्क्रिन शॉटवरील क्यूआर कोड स्वीकारला जाणार नाही.
५. वेबसाईटवर ताशी ८०० क्यूआर कोडचे वाटप केले जाईल...सध्याच्या केवळ २५० क्यूआर कोडचे वाटप होत आहे.
६. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसासाठी ताशी ८०० क्यूआर कोड तयार करुन दिले जातील.