छोटा राजन आणि दाऊदमध्ये वादाला सुरूवात
दाऊद आणि छोटा राजन यांच्यातली मैत्री खूपच जुळून आली होती, त्यांचा एकमेंकांवर प्रचंड विश्वास होता.
मुंबई : दाऊद आणि छोटा राजन यांच्यातली मैत्री खूपच जुळून आली होती, त्यांचा एकमेंकांवर प्रचंड विश्वास होता. छोटा राजन दाऊद भाईच्या इशाऱ्यावर कामं करू लागला, आता दाऊदच्या गँगमध्ये २ छोटा होते, एक छोटा राजन आणि दुसरा छोटा शकील, जे दाऊद भाईसाठी जान देणाऱ्यातले होते.राजनला १९८७ मध्ये काम सांभाळण्यासाठी दाऊदने दुबईला पाठवलं, यानंतर एका वर्षाने छोटा शकीलनेही दुबईची वाट धरली, पण दाऊद इंब्राहिमची थोटा राजनसोबत प्रचंड जवळीक होती, शकीलची तेवढी नव्हती. तेच शकीलला सहन होत नव्हतं. यामुळे छोटा राजन विरोधात, गँगमधून शकील समर्थकांनी दाऊदकडे तक्रारी करण्यास सुरूवात केली होती.
दाऊद आणि छोटा राजनची जवळीक छोटा शकीलला सलत होती
दाऊद आणि छोटा राजन यांच्या जवळीकतेचे असे अनेक क्षण आले, अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्या छोटा शकीलला या गोष्टी आवडल्या नाहीत, आणि तो पचवूही शकला नाही, कारण अनेक वेळा दाऊद इब्राहिमने सर्वात जास्त विश्वास हा छोटा राजनवर दाखवला, छोटा राजनला गँगमधील अनेक लोक 'नाना' म्हणून हाक मारत. दाऊदच्या नावाने बिल्डर्स आणि श्रीमंत लोकांकडून वसुली करण्याची जबाबदारी छोटा राजनची होती. एवढंच नाही कोणतंही कंत्राट घेताना, त्याची ३ ते ४ टक्के फी, म्हणजेच टक्केवारी राजनला द्यावी लागत होती.
पोलिसांच्या आकड्यानुसार नव्वदच्या दशकात छोटा राजनची कमाई दर महिन्याला ८० लाख रूपयांच्या जवळपास होती. असंही म्हणतात की तेव्हा छोटा राजनच्या नावावर १२२ निनावी हॉटेल्स आणि पब होते. या कमाईचा भाग गँगमधील गुंडांच्या केसेस लढवण्यासाठी देखील खर्च केला जात होता.
यानंतर काय झालं हे, खालील क्रमाने वाचा
५) छोटा राजन आणि दाऊदची 'ही दोस्ती तुटायची नाय'...पण
६) दाऊदला छोटा राजनविषयी वाईट बोललेलं आवडतं नव्हतं...!
७) छोटा राजनला फोन, "नाना वो तुमको टपकाने का प्लानिंग किएला है"
८) छोटा राजनला अखेर पत्रकाराची हत्या महागात पडली
आणि पुन्हा क्रमांक १ खाली
१) मोठा राजनच्या हत्येनंतर छोटा राजन पुढे आला...
२) छोटा राजनच्या नावाची दहशत सुरू झाली या घटनेवरून...
३) दाऊद-छोटा राजनची पहिली भेट, मोठा राजनच्या हत्येचा बदला