छोटा राजनच्या नावाची दहशत सुरू झाली या घटनेवरून...
लाठी चार्जचा राजनला राग आला, आणि पोलिसांची काठी हिसकावत, पोलिसांनाच
मुंबई : दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यातील जवळीक छोटा शकीलल सहन होत नव्हती. असं म्हणतात, छोटा शकीलने छोटा राजनचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला होता. याचवेळी १९९३ च्या बॉम्ब स्फोटानंतर छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमची मैत्री संपुष्टात आली. राजेंद्र सदाशिव निकाळजे म्हणजेच छोटा राजन, चेंबूरच्या टिळक नगरमध्ये १९६० साली सामान्य मराठी कुटूंबात जन्माला आलेला. छोटा राजनचे वडील ठाण्यात नोकरीला होते, राजनला ३ भाऊ आणि २ बहिणी होत्या. राजनचं शिक्षणात मन लागत नव्हतं, पाचवीपर्यंत शिकल्यानंतर राजेंद्रने शाळा सोडली, आणि जगदीश गुंगाच्या गँगमध्ये तो सामिल झाला. राजेंद्र म्हणजेच छोटा राजनचं सुजाता नावाच्या मुलीसोबत लग्न झालं, त्यांना ३ मुली झाल्या.
छोटा राजनचा सिनेमाचं तिकीट ब्लॅक करण्याचा धंदा
पोलिसांनी १९७९ च्या आणीबाणीनंतर काळाबाजार करणाऱ्यांवर फास आवळण्यास सुरूवात केली, यावेळी १९ वर्षाचा हा तरूण मुंबईच्या सहकार सिनेमाजवळ तिकीट ब्लॅक करून विकत होता. लोक सांगतात की, पोलिसांनी एकेदिवशी सहकार सिनेमाच्या बाहेर लाठी चार्ज सुरू केला, लाठी चार्जचा राजनला राग आला, आणि पोलिसांची काठी हिसकावत, पोलिसांनाच मारहाण करण्यास त्याने सुरूवात केली.
पोलिसांशी राजनची ही पहिली झटापट होती. यात काही पोलिसवाले जखमी झाले, यामुळे अनेक गँगवाल्यांनी राजनला आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न केला, राजन हा ५ फूट आणि ३ इंचाचा तरूण होता. राजनने मोठी गँग ज्वाईन करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर काय झालं हे, खालील क्रमाने वाचा
३) दाऊद-छोटा राजनची पहिली भेट, मोठा राजनच्या हत्येचा बदला
४) छोटा राजन आणि दाऊदच्या मैत्रीत असं काही झालं....
५) छोटा राजन आणि दाऊदची 'ही दोस्ती तुटायची नाय'...पण
६) दाऊदला छोटा राजनविषयी वाईट बोललेलं आवडतं नव्हतं...!
७) छोटा राजनला फोन, "नाना वो तुमको टपकाने का प्लानिंग किएला है"
८) छोटा राजनला अखेर पत्रकाराची हत्या महागात पडली
आणि पुन्हा क्रमांक १ खाली
१) मोठा राजनच्या हत्येनंतर छोटा राजन पुढे आला...
२) छोटा राजनच्या नावाची दहशत सुरू झाली या घटनेवरून...