मुंबई : CM Eknath Shinde canceled all programs : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दिवसभरातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठिक नसल्याने सर्व प्रशासकीय कार्यक्रम आणि बैठका रद्द केल्या आहेत. सततचे दौरे आणि पहाटेपर्यंत चालणाऱ्या सभा यांमुळे मुख्यमंत्र्यांना थकवा आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांनी अनेक दौरे केलेत. त्यांनी विश्रांती घेतलेली नाही. त्यामुळे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री शिंदे यांना थकवा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी शिंदे यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांनीही माहिती दिली. मुख्यमंत्री यांची जागरणामुळे तब्येत नाजूक आहे. फार गंभीर काही नाही. थोडा आराम करून ते पुन्हा कामाला लागतील, असे शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.


दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांनीही आजचे सर्व कार्यक्रम तातडीने रद्द केले आहेत. फडणवीस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे.


शिंदे गटातून याबाबत आपल्याला काही कल्पना नसल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत, यावर मला काही त्याबद्द्ल माहिती नाही. काही प्रशाशकीय कामानिमित्त ते जात असतील. लगेच तुम्ही मंत्रीमंडळाबद्दल काही हालचाली असे म्हणाल तर तसे काही नाही, असे दीपक केसरकर म्हणाले. तसेच प्रताप सरनाईक म्हणाले, प्रशासनातील कामकाजाचा तो भाग असतो. दिल्लीला गेलं की लगेच विस्ताराचा विषय येतो. तो लवकरात लवकर होईल, असे त्यांनी म्हटले.