मुंबई : Chief Minister Uddhav Thackeray on BJP : आम्हाला विकास करायचा आहे. त्यादृष्टीने काम हाती घेतले आहे. आरेतील जंगल वाचवले आहे. विकासाच्या नावाखाली काहीहीं पाप करुन ठेवले आहे. ते सुधारायला वेळ लागेल, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे. नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलेले नाही. मात्र जनतेनं काळजी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. दरम्यान, आता पंचमहाभूते आठवत आहेत, एवढी वर्ष विकासच भूत बसली होती, विकासाच्या आड कोणीही येत नाही. वृक्ष तोडून विकास होत आहे, हा कोणता विकास? वांद्रातील मातोश्रीत 66 साली राहायला गेलो. तिकडे कांदळवन पसरलेलं होत, तिकडे आता सगळे टॉवर झालेत. सगळीकडे टॉवर आले आहेत, असे सांगत पर्यावरण आणि विकास दोन्ही पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ते बोलत होते. पर्यावरणाला धोका न पोहोचवता विकास कसा साधला पाहिजे, यावर भर दिला पाहिजे. पर्यावर नष्ट करुन विकास करता कामा नये. आता तुम्ही पाहत आहात पाऊस कसा पडतो ते. वृक्ष तोडून विकास होत आहे. हा कोणता विकास आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित केला.


मुंबई आर्थिक केंद्र आहे, पण नुसतं सिमेंटचे जंगल झालेय. पाऊस IPL सारखा झाला आहे, रेकॉर्ड मोडतो. विकासाच्या नावाखाली पाप करुन ठेवले आहे ते सुधारायला वेळ लागेल, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला हाणला. यावेळी मनसेलाही टोला लगावला. ते भोंगे वेगळे, आता कर्णकर्कश भोंगे जोरजोरात वाजवतातेय, असे मुख्यमंत्री म्हणाले.