राणीबागेत प्राणी पक्षांसाठी ६ दालनांचं मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन
पेंग्विन पाठोपाठ देश विदेशातील प्राणी पक्षीही बागेत दाखल झाले
मुंबई : मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीच्या बागेत प्राणी पक्षांच्या वेगवेगळ्या ६ दालनांचं उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही यावेळी उपस्थित होते. पेंग्विन पाठोपाठ देश विदेशातील प्राणी पक्षीही बागेत दाखल झाले असून त्यांच्या नैसर्गिक राहण्याच्या पद्धतीने त्यांना इथं ठेवण्यात आलं आहे.
प्राण्यांसाठी काचेची दालनं
देश विदेशातील 100 विवध पक्षी पर्यटकांना इथं जवळून न्याहाळता येणार आहे. तर बिबटया, अस्वल, कोल्हा, तरस, कासव यांचंही दर्शन इथं मुंबईकरांना घडणार आहे. पक्षांसाठी तबाबा पाच मजली एवढं मुक्त पक्षी विहार बांधण्यात आले असून प्राण्यांसाठी काचेची दालनं उभारण्यात आली आहेत.