मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कॅबिनेट बैठकीत सूचक वक्तव्य, म्हणाले यापुढे ही...
सीएम उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हे सूचक वक्तव्य बरंच काही सांगून जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर शेवटी म्हटलं की, 'या पुढे सहकार्य राहू द्या, धन्यवाद.' उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर सरकार संकटात असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे हे राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्रीअनिल परब हे ऑनलाईन उपस्थित होते.