मुंबई : नवजात चिमुकल्यांची विक्री करणारी टोळी (Sale of newborns in Mumbai) मुंबई पोलिसांनी (Mumbai police) उध्वस्त केली आहे. धक्कादायक म्हणजे नवजात मुलांची विक्री करणाऱ्या या टोळीमध्ये (Child trafficking gang) डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन यांचा देखील समावेश आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लहान मुले गायब होण्याच्या घटना वाढल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत मुले गायब होत असल्याच्या वारंवार तक्रारी येत असल्याने मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी या प्रकरणांचा छडा लावत होते. काही दिवसांपासून आरोपींच्या शोधात असलेल्या पोलिसांना अखेर यश आले. वांद्रे खेरवाडीत महिलांनी आपली मुलं एजंटमार्फत विकल्याचे समजताच त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपास सुरू असतानाच लहान मुलांची विक्री करणाऱ्या टोळीपर्यंत पोलीस जाऊन पोहोचले. 


पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या टोळीतील सहा एजंटमध्ये पाच महिला आहेत. हे रॅकेट ज्या महिलांना मुलं होणार आहे, मात्र त्या मुलाचं पालन पोषण करण्यास महिला सक्षम नाहीत. अशा महिलांचा शोध घ्यायचे. त्यांनी बाळाला जन्म दिला की, या नवजात मुलांची खरेदी विक्री व्हायची. आतापर्यंत या टोळीने तीन मुलांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार केला आहे. मुलगी 60 हजार रुपये तर मुलगा असेल तर 1.5 लाख रुपयांच्या व्यवहार व्हायचा अशी माहिती पुढे आली आहे.