मुंबई : 'देव तारी त्याला कोण मारी', या उक्तीप्रमाणे ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झालीय. काही मुलं फुटबॉल खेळताना फुटबॉल पकडण्यासाठी धावतात. तेव्हा आपल्या सवंगड्याकडे बॉल देऊन हा मुलगा बुटाची लेस बांधायला खाली बसला. मात्र त्याचवेळी मागे उभी असलेली महिला गाडी सुरू करते आणि त्या मुलाच्या अंगावरून गाडी नेते. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र मुलाचे दैव बलवत्तर म्हणूनच त्याला काहीही न होता, तो गाडी गेल्यावर उठून पळताना सीसीटीव्हीत चित्रीत झालाय. ही घटना २४ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता घडलीय. मात्र ही घटना कुठे घडली आहे याबाबत कळू शकलं नाही. 


या घटनेनंतर आपल्या मुलांकडे खेळताना लक्ष देण्याची गरज असल्याचं आधोरेखित होतं. त्याचबरोबर गाडी चालवताना आपलं लक्ष चौफेर असणंही महत्त्वाचं आहे जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही.