Urfi Javed vs Chitra Wagh : भाजप नेत्या चित्रा किशोर वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed ) यांच्यातील वादामुळे ऐन थंडीत राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.  चित्रा वाघ यांच्याकडून हल्ला होण्याची भीती व्यक्त करत उर्फी जावेदने महिला आयोगात धाव घेतली आहे. वाघ यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची विनंती उर्फी जावेदने केली आहे. उर्फीनंतर आता नंतर लावणी स्टार गौतमी पाटीलचा (Gautami Patil) नंबर लागू शकतो. गौतमी पाटील बाबत चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. 


उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद शिगेला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रा वाघ त्यांच्या कार्यकर्त्यांसह आपल्यावर हल्ला करु शकतात, तेव्हा  चित्रा वाघ यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी उर्फी जावेदनं महिला आयोगाकडे केलीय. उर्फी जावेदनं शुक्रवारी राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जात ही विनंती केलीय. ट्टिटरच्या माध्यमांतून धमक्या देण्यासारखे प्रकार घडत असल्याकडेही तीने महिला आयोगाचं लक्ष वेधलं. आपण लवकरच याबाबत ऑनलाईन तक्रार दाखल करु, त्यावर महिला आयोगाने कारवाईचे आदेश द्यावेत अशी विनंती तीने केल्याची माहिती मिळत आहे. 


उर्फीचा नंगानाच थांबवल्याशिवाय शांत बसणार नाही - चित्रा वाघ आक्रमक


उर्फीचा नंगानाच थांबवल्याशिवाय शांत बसणार नाही असं म्हणत चित्रा वाघ यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. उर्फी प्रकरणात मला घेरण्याचा प्रय्तन केला जातो. ज्याच्यात जेवढा दम आहे त्याने तेवढा दम लावावा,माझा हा लढा सुरुच राहील असं  म्हणत चित्रा वाघ यांनी माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 


गौैतमी पाटील बाबत काय म्हणाल्या चित्रा वाघ


उर्फी प्रमाणेच गौतमी पाटील देखील चांगलीच चर्चेत आहे. गौतमी पाटीलने आपल्या डान्सने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. गौतमी पाटीलच्या एका डान्स कार्यक्रमांना तुफान गर्दी होत आहे. अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. गौतमी पाटीलबाबात चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे. गौतमी पाटील कोण आहे हे मला माहित नाही. विक्षिप्त डान्स वाटत असेल तर विरोध करायला पाहिजे. गौतमीच्या व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे पाठवल्या असत्या तर मी त्यावर बोलले असते असं चित्रा वाघ म्हणाल्या.