CIDCO Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी कामाची बातमी आहे. शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच सिडको अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सिडकोमध्ये अकाऊंट क्लर्कच्या एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असावा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिडको अकाऊंट क्लर्क पदासाठी अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबर 2023 पासून सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 23 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. लेखा लिपिक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला एस-8 नुसार दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 


उमेदवारांना सिडकोच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या. 


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा