मुख्यमंत्र्यांकडून वर्सोव्यातील कोळी बांधवांना आश्वासन
या दहा दिवसांच्या वर्सोवा फेस्टिवल मध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मुंबई : वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या आमदार भरती लव्हेकर यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षांपासून वर्सोवा फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत आहे. या दहा दिवसांच्या वर्सोवा फेस्टिवल मध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या फेस्टिवलचे उद्घटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार, आमदार विनायक मेटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार भारती लव्हेकर यांनी वर्सोवा मधील कोळी बांधवांचे मुलभुत प्रश्न मांडले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोळी बांधवांच्या प्रश्नाची उत्तर दिली. मुख्यमंत्री म्हणाले, येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात डीपी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या डीपीमध्ये कोळीवाडे अधोरेखित करण्यात येतील. आणि त्याच्या DGR मार्फ़त विचार करण्यात येईल असे फडणवीस यांनी सांगितले.