मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानसभेतही उमटले. भायकळ्यातून निघालेला मोर्चा आझाद मैदानात धडकल्यानंतर मराठा समाजातील २४ सदस्यांची समिती मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहचली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात ही बैठक नुकतीच पार पडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचं आश्वासन दिलंय. तसंच ६०५ अभ्यासक्रमांना ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती मराठा विद्यार्थ्यांनाही मिळणार, असंही आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.  


मुख्यमंत्री आणि मराठा मोर्चा शिष्टमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर सरकारनं एक प्रस्ताव मोर्चेकऱ्यांसमोर मांडला. या प्रस्तावानुसार... 


- मंत्रीमंडळची उपसमिती नेमून दोन ते तीन महिन्यांत आरक्षणा संदर्भातल्या निकषांचा आढावा घेणार


- बार्टीच्या धर्तीवर सारथीचं सक्षमीकरण करण्यात येईल


- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुण बेरोजगारांना जास्तीत जास्त लाभ देण्यात येईल


- प्रत्येक जिल्ह्यात मराठा मुले - मुली यांच्यासाठी वसतिगृह बांधण्यात येईल


सवलतीसाठी ६० टक्क्यांची अट काढून टाकण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं असलं तरी यामुळे समितीतील सदस्यांचं मात्र समाधान झालेलं नाही.