अफरोझच्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम
मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या अंधेरीमधल्या वर्सोवा चौपाटीला भेट देऊन वर्सोवा चौपाटी स्वच्छता मोहिमेचे प्रमुख अफरोझ यांचं विशेष कौतुक केलं.
मुंबई : मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या अंधेरीमधल्या वर्सोवा चौपाटीला भेट देऊन वर्सोवा चौपाटी स्वच्छता मोहिमेचे प्रमुख अफरोझ यांचं विशेष कौतुक केलं. यावेळी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
यानिमित्तानं राज्याची मरीन लिटर पॉलिसी राज्य सरकार लवकरच तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या पॉलिसी किंवा या धोरणाच्या निमिताने राज्यातील समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याबाबत तसंच समुद्रात सांडपाणी सोडण्याबाबत नियमावली धोरण तयार होणार आहे.
मुंबई आणि परिसरच्या समुद्रात दररोज एकवीसशे दशलक्ष लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडलं जातं. यामुळे मुंबई आणि परिसरातला समुद्र किनारा अत्यंत प्रदूषित झाला आहे. म्हणून समुद्रात सोडलं जाणारं सांडपाणी प्रक्रिया करूनच सोडण्याबाबतचा प्रकल्प राबवणार असल्याचं मुख्यमंत्रयांनी यावेळी सांगितलं. आदित्य ठाकरे यांनीही या मोहिमेला पाठींबा देत पर्यावरण वाचवण्यासाठी सर्व पावले उलचणार असल्याचं स्पष्ट केलं.