मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यामधली बैठक संपली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी राणेंना एनडीएमध्ये यायची ऑफर दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या ऑफरबद्दल आपण दोन दिवसांमध्ये कळवणार असल्याचं राणेंनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबतच्या राजकीय चर्चा मी आज जाहीर करणार नाही, असं राणे म्हणाले आहेत. शिवसेना फक्त धमक्या देते, ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत, असा टोलाही राणेंनी लगावला आहे.


शरद पवारांनी केलेल्या टीकेलाही नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पक्ष स्थापन करायच्या एक दिवस आधी मी शरद पवार यांना भेटलो आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी जे काही वक्तव्य केलं, ज्या गोष्टी रेकॉर्डवर आणल्या ते करायला नको होतं, असं मत राणेंनी व्यक्त केलं आहे.


नारायण राणे स्वत:च्या मुलाला पक्षात घेऊ शकले नाहीत. नवीन पक्ष काढून ते काय करणार, असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारला होता.