मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पुन्हा बंद दरवाज्याआड चर्चा झाली आहे. निमित्त होते गोदावरी अर्बन बँकेच्या नरिमन पॉईंट इथल्या प्रशासकीय शाखेच्या उद्घाटनाचे. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट कोपरेटिव्ही सोसायटीच्या प्रशासकीय शाखेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर त्याच इमारतीमध्ये एका हॉटेलमध्ये त्यांनी एकत्र अल्पोपहार घेत सुमारे १५ मिनिटे चर्चाही केली.


गेल्या दोन दिवसांतील मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची ही दुसरी भेट आहे. त्यातच अधिवेशन असल्यानं आता नक्की बंद खोलीत काय वेगळी चर्चा केली याची उत्सुकता आहे.