मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या सर्व शंकांचं निरसन चर्चेद्वारे करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अधिवेशनात २१ विधेयकं मांडण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच विरोधकांकडून सकारात्मक सूचना आल्या आणि त्या व्यवहार्य असल्या तर त्यांचं स्वागत करु, मात्र राजकीय फायद्यासाठी गोष्टी ठेवल्या तर सडेतोडपणे उत्तर देऊ असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. सरकार 5 वर्षाचा शिवसेनेसोबतचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.


शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सोमवारपासून


88 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून राज्यावरील दुबार पेरणीचं संकट टळलं आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तसंच शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सोमवारपासून सुरु होत असून त्यासाठी ऑनलाईन केंद्र उभारण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिलीय.