Maharashtra Politics : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी (Mumbai Municipal Election 2022) शिंदे गट (Shinde Group) सज्ज झाला आहे. सरकार बदललं आहे, आता मुंबई बदलणार आहे, सरकारला सगळ्यांची साथ हवी आहे, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं आहे. राज्यात चांगली साफसफाई करायची आहे, वाईट सगळं घालवायचं असून आम्ही चांगला कार्यक्रम करतो हे दाखवून दिलं. जे वाईट ते सगळे घालवायचं आहे असं सांगत एकनाथ शिंदे यांनी सूचक इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

90 दिवसात मुंबईचं रुप बदलणार असून खड्डे, बगीचा सुशोभीकरण, जूने किल्ले विद्युत सुशोभिकरण केले जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 90 दिवसात मुंबईतील प्रमुख रस्ते खड्डेमुक्त (Roads free of potholes) करण्याचं अभियान राबवलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावर्षी 450 किमी रस्ते सिमेंटचे करत आहोत, त्यासाठी साडेपाच हजार कोटी निधी दिला आहे, पुढच्या दोन वर्षात मुंबईत खड्डे दिसणार नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 


पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) हाती झाडू घेऊन बरीच साफसफाई केली, आपल्याला तसंच करायचं आहे, आपणही चांगले कार्यक्रम करू शकतो असं वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला (Thackeray Group) जोरदार इशारा दिला. बीएमसीच्या कारभारावरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला हा इशारा दिलाय. राज्यात चांगली साफसफाई करायची, वाईट सगळं घालवायचं, आम्ही चांगला कार्यक्रम करतो हे दाखवून दिलं असं मुख्यमंत्री म्हणाले.