मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळ विस्तारबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले आषाढी एकादशीची पूजा झाल्यानंतर करणार आहे. याबाबत लवकरच सांगण्यात येईल. मात्र अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. 


18 जून रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असंही कयास आहे. मुंबईत भेटून चर्चा करू आणि लवकरच या प्रश्नाचं उत्तर देऊ असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 


भाजप सेना युतीचं जे सरकार अडीत वर्षांपूर्वी स्थापन व्हायला हवं ते आता आम्ही केलं आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. 5 वर्ष ज्यांनी खूप चांगलं काम केलं. शेतकरी आणि लोकहिताचं काम केलं ते मधल्या काळात खंडीत झालं. ते आम्ही पुन्हा पुढे नेणार आहोत असंही मुख्यमंत्री बोलताना म्हणाले.