Coastal Road subway leak: कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाला गळती लागल्याची बातमी झी 24 तासने सर्वप्रथम दाखवली होती. या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बातमीची दखल घेतली आहे. तसेच त्यांनी कोस्टल रोडची पाहणीदेखील केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाला गळती लागली होती.. झी २४तासनं सर्वात प्रथम ही बातमी दाखवली होती.. या बातमीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात कोस्टल रोडची पाहणी केली आहे. कोस्टल रोड गळतीप्रकरणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकारी आणि कोस्टल रोडशी संबंधित अधिका-यांशी चर्चा केली. यावेळी काही एक्सपर्टची मत देखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. 


हे ही वाचा: 14 हजार कोटींचा कोस्टल रोड पण 2 महिन्यांच्या आतच रस्त्याची झालीय 'अशी' दुर्दशा


मुंबईच्या वाहतुक कोंडीवर उपाय


मुंबईच्या सागर किनाऱ्याने दक्षिण-उत्तर दिशेला जोडणारा कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तब्बल चौदा हजार कोटींचा कोस्टल रोड म्हणजे सागरी महामार्ग हा मुंबईच्या वाहतुक कोंड़ीवर उपाय असल्याचं सांगितलं जातं. मुंबईच्या समुद्रात किनाऱ्यालगत काही ठिकाणी भरावावर, कुठे बोगद्यातून तर कुठे ब्रिजवरून हा रस्ता जाणार आहे. जिथे रस्त्यांची अदलाबदल होते अशा ठिकाणी कनेक्टर जंक्शन उभी केली जाणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत 8 मार्गिकांच्या रस्त्याला लागूनच लोकांना चालता येईल असा मार्ग, पार्किंग आणि बागेसाठीही जागा तयार केली जाणार आहे.


निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून उद्घाटन 


उद्घाटनानंतर 2 महिन्यांच्या आत रस्त्याची दुर्दशा झाल्यानं शिवसेना ठाकरे गटानं सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर मताच्या जोगव्यासाठी घाईघाईने या रोडचं उद्घाटनही कऱण्यात आलं. मात्र त्याची कुठलीच प्री मान्सून चाचणी झाली नसल्याची माहीती समोर येतेय. एवढच नाही तर  या प्रकल्पाला ना कंम्प्लायन्स सर्टीफिकेट मिळालय, ना सीसी. फक्त निवडणूका डोळ्यासमोर ठेवूण लोकांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप आमदार सचिन अहिर यांनी केलाय.


काय म्हणाले मुख्यमंत्री?


कोस्टलच्या बाबत मी काल माहिती घेतलेली आहे. ग्राऊटिंग मध्ये काही लिकेज आहेत. येथे महापालिका अधिकारी अमित सैनी काल स्वतः गेले होते.  आता सर्व टेक्निकल एक्सपर्ट त्या ठिकाणी आहेत. ही परमनंट दुरुस्ती असली पाहिजे अशी सूचना मी त्यांना दिलेली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. 


राज्याच्या व्यवस्थापना बाबत झालेल्या बैठकीत आर्मी, आणि इतर यंत्रणा याबाबत चर्चा झाली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन, मान्सूनपूर्व बाबत काय काळजी घ्यायची याबाबत सर्व विभागाशी चर्चा झाली. होर्डिंग, दरड, लँड सायडिंग याबाबत या बैठकीत चर्चा झाली. मुंबईत जिथे लँड साईट होऊ शकत त्यांची पर्याय व्यवस्था करण्याबाबत चर्चा झाली.सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून काम करावं आणि झिरो कॅज्यूलिटी मिशन अमलात आणावं, अशा सुचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 


सर्व विभागानी केलेली तयारी याचा आढावा आज घेतला गेला. पावसाळ्याच्या गावांचा संपर्क तुटतो त्या गावांना औषध आणि त्यांना इतर सुविधा कशा देता येतील, अन्नधान्य कसं देता येईल याबाबत चर्चा झाली. कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश येथून जे पाणी येतं त्याबाबत देखील चर्चा झाली आणि कोऑर्डिनेशन करण्यात येणार आहे


आय एम डी चे अधिकारी देखील यावेळी होते. एखादा अलर्ट आला तर त्याच्या सूचना आधी द्याव्या आणि जनजागृती करावी या सूचना देखील देण्यात आल्या. येणाऱ्या संकटांची लोकांना आधीच माहिती देण्यात यावी याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. यावेळी सुदैवाने चांगला पाऊस आहे त्यामुळे त्याची तयारी कशी करता येईल यावर चर्चा झाली. दरडग्रस्त भाग आहेत तेथील लोकांना इतर ठिकाणी हलवने असेल किंवा धोकादाय इमारतील लोक यावर देखील चर्चा झाली. साथीचे आजार यावर देखील चर्चा झाली. 


काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे तिथे पिण्यासाठी टँकर जनावरांसाठी चारा आणि पाणी कसा देता येईल, अवकाळीवर देखील चर्चा झाली मदत आणि पंचनामे कशी सुरू आहे, सध्या आपण तीन संकटांना सामोरे जात आहोत, लोकांना कोणताही त्रास होऊ नये लोकांचे नुकसान होऊ नये याची पूर्णपणे सरकार म्हणून काळजी कशी घेतली जाईल यावर चर्चा झाली. 


रेल्वे एअरपोर्ट आर्मी, कोस्टगार्ड यांच्या सर्व टीम सज्ज आहेत. आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. सर्व अंमलबजावणी होईल आणि पावसाळ्यात कुठे काही आपत्ती संकट येणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.