कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना उद्धव ठाकरेंचं कळकळीचं आवाहन, म्हणाले...
प्लाझ्मा थेरपीच्या उपचारांबाबत महाराष्ट्राचा देशाचा पहिला क्रमांक लागत असावा
मुंबई: राज्यातील कोरोना व्हायरसच्या Coroanvirus वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमवीर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनातून बऱ्या झालेल्या महाराष्ट्रातील लोकांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले. या लोकांनी स्वत: पुढे येऊन प्लाझ्मा डोनेशन करावे, असे उद्धव यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपीच्या उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्लाम्झा थेरपी झालेल्या १० रुग्णांपैकी ९ रुग्ण कोरोनातून बरे होत आहेत. त्यामुळे आता रक्तदानाप्रमाणे प्लाझ्माही दान करण्याची गरज आहे. त्यासाठी कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांनी पुढे यावे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच राज्यात अनेक ठिकाणी प्लाझ्मा उपचाराची केंद्रे उभारण्यात येत आहेत. कदाचित प्लाझ्मा थेरपीच्या उपचारांबाबत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागत असावा, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
३० जूननंतर लॉकडाऊनचं काय? उद्धव ठाकरे म्हणाले....
तसेच कोरोनाच्या उपचारांमध्ये आपण जागतिक स्तरावर चर्चा असणारे जवळपास प्रत्येक औषध वापरत असल्याचेही उद्धव यांनी म्हटले. जो आपला टास्क फोर्स आहे, उपचाराच्या बाबतीत जगाच्या बरोबरीनं आपण चाललेलो आहोत. एक सूत भर सुद्धा आपण जगाच्या पाठीमागे नाही. चोहीबाजूंनी आपली नजर आहे. कोणत्या देशात काय चाललं, या देशात काय चाललं. कोणते उपचार होत आहेत, कोणते औषधी आहेत. गेल्या आठवड्यामध्ये मला मेसेज आलेले एक बातमी होती डेक्सामेथाझोन हे नवीन औषध सापडल्याची. मी टास्क फोर्सच्या डॉक्टरांना फोन केला. ते म्हणाले उद्धवजी हे औषध आपण गेल्या दोन महिन्यांपासून आवश्यकतेनुसार वापरत आहोत. त्यामुळे महाराष्ट्र कोरोना उपचाराच्याबाबती एक पाऊल पुढेच आहे, असे उद्धव यांनी सांगितले.
'बोगस बियाणांमुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार'
दरम्यान, आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये उद्धव ठाकरे यांनी ३० जूननंतर लॉकडाऊनची परिस्थिती काय असेल, हेदेखील स्पष्ट केले. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी सुरु करत आहोत. सगळं सुरु झालं म्हणजे संकट संपले असा समज करुन घेऊ नका. लोकांनी कुठेही गर्दी केल्यास त्या भागात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचे अधिकार प्रशासनाला देण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.