३० जूननंतर लॉकडाऊनचं काय? उद्धव ठाकरे म्हणाले....

हे सरकार काळजीवाहू नाही तर काळजी घेणार आहे

Updated: Jun 28, 2020, 02:13 PM IST
३० जूननंतर लॉकडाऊनचं काय? उद्धव ठाकरे म्हणाले.... title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी १.३० वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या लाईव्हमध्ये ३० जूननंतरच्या लॉकडाऊनचं काय? याबाबत माहिती दिली. उद्याचा दिवस १ जुलै हा कोरोना यौद्धांचा असणार आहे. १ जुलै रोजी जागतिक डॉक्टर दिन आहे. तसेच १ जुलै शेतकरी दिन म्हणून साजरा करतो. या दोन्ही दिवसाकरता त्यांचे आभार मानले आहेत. 

३० जूननंतर काय होणार? 

हळूहळू सोईसुविधा उघडत जाणार. पण लॉकडाऊन उघडणार का? तर त्याचं उत्तर नाही आहे. 
आजपासून सलून आणि पार्लर सेवा सुरू केलं आहे. 
अजूनही संकट टळलेलं नाही. मिशन बिगीन अगेन आहे पण धोका टळलेला नाही. 
अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी उघडत चाललो आहोत. काही गोष्टी उघडल्या म्हणजे धोका टळलं असं नाही. 
अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका. 

CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State

Posted by CMOMaharashtra on Sunday, June 28, 2020

आपलं सरकार काळजीवाहू नाही. हे सरकार महाराष्ट्राची काळजी घेणार आहे. धोक्यापासून सावध करण्यासाठी हे सरकार आहे. 
लोकल रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. तर ती अत्यावश्यक सेवेकरता त्या सुरू केल्या आहेत. 
लॉकडाऊनमध्ये सगळं थांबल असताना शेतकरी मित्र मात्र थांबला नाही. पण या शेतकऱ्यांना आता बोगस बियाणं मिळत असल्याचं समोर आलं आहे. 
शेतकऱ्यांनी काळजी करू नका. हे सरकार तुमचं आहे. कायद्याच्या कचाट्यातून शेतकऱ्यांना फसवणारे सुटणार नाही. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार. 

प्लाझ्मा थेरपीबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री? 

चहुबाजूला आपली नजर आहे. कोणत्या देशात नेमकं काय सुरू आहे? प्लाझ्मा थेरपी आपण मार्चपासून करत आहोत. प्लाझ्मा थेरपीचा वापर आता आपण करत आहोत. त्याकरता उद्या सोमवारी कदाचित देशातील सर्वात जास्त प्लाझ्मा थेरपीच्या केंद्राचं लोकार्पण करण्यात येणार आहे. रक्तदान करतो त्याप्रमाणे प्लाझ्माचं देखील दान करता येतं. कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान करावं. 

औषध मोफत उपलब्ध करून देणार? 

कोरोनासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचे मोफत वाटप करणार. शासकीय आणि निमशासकीय रूग्णालयात या औषधांच मोफत वाटप करणार. त्यामुळे रूग्ण वाढले तरी त्यांना उपचार मिळणार हा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला.

रूग्णांची संख्या वाढली तरी उपचाराची सुविधा देखील वाढली आहेत. रूग्णांना औषध मोफत उपलब्ध होण्याची सुविधा केली जाणार आहे. 

त्याचप्रमाणे ज्येष्ठ आणि अनुभवी डॉक्टरांनी देखील पुढे यावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. कोविड यौद्धाला आवश्यक ती सर्व जबाबदारी सरकारने घेतली आहे. ज्येष्ठ डॉक्टरांची अनुपस्थिती अनुभवत आहोत. त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या कामावर रुजू व्हावं. खासगी किंवा सरकारी रूग्णालयातील डॉक्टरांनी कामावर रूजू व्हाव.

पावसाळ्यात विशेष काळजी घ्या? 

कोरोनासोबतच मलेरिया, डेंग्यूचा देखील या पावसाळ्यात वाढणार आहे. सफाई कामगार आपलं काम करतंच आहे. पण या काळात प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी. आपला परिसर स्वच्छ ठेवावा. 

आरोग्यासाठी काही प्रमाणात परवानगी दिली आहे. भाजी खरेदी करताना सोशल डिस्टन्शिंगचा वापर करा. 

लॉकडाऊन करायचा की नाही? याचा निर्णय मी जनतेवर सोडला आहे. जनतेने घरी राहून आपला पाठिंबा दर्शवला नाही तर लॉकडाऊन करावं लागेल. अधिकाऱ्यांना मी काही सूचना दिल्या आहेत. गरज वाटल्यास त्या ठिकाणी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल. 

शाळा सुरू होणार का? 

शाळा सुरू होणार का? यापेक्षा शिक्षण कसं सुरू होईल याकडे लक्ष आहे. त्यापद्धतीने पाऊल उचलली आहेत. 

तरूणांनी बाहेर पडावं. ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडू देऊ नका. तुम्ही आपापल्या कुटुंबियांची काळजी घ्या. 

लॉकडाऊन शब्द उच्चारला नाही तर लॉकडाऊन नाही असं नाही. काही नियमांच पालन हे करावंच लागेल.