मुंबई: एकीकडे महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना आता दुबईला जाण्याचे वेध लागले आहेत. या मंत्र्यांनी दुबईला जाण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा संपूर्ण प्रकार पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले आहेत. 6 मंत्री आणि 54 अधिकारी दुबईला जाण्याच्या तयारीत आहेत. दुबईला जाण्यासाठी विनंती अर्ज आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात अर्जांचा पाऊस पडला आहे. 



राज्यातील जनता एकीकडे महागाईनं होरपळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. जनता अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असताना दुसरीकडे मंत्र्यांना दुबईत जायचं आहे. 


या सगळ्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. ही संख्या आटोक्यात आणावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी सचिवांशी चर्चा केली आहे. नवाब मलिक दुबईला गेले आहेत. एकीकडे राज्यातील जनता अडचणीत असताना मंत्र्यांना मात्र दुबईचे वेध लागले आहेत.