आरेमध्ये कारशेड होणार नाही; मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
कांजुरमार्ग कारशेडला शून्य रुपये होणार खर्च
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी दीड वाजता राज्याच्या जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी महत्वाची घोषणा आरे कारशेड कांजुरमार्ग येथे हलविणार असल्याची माहिती दिली. आरे कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे सरकारने मागे घेतले आहे.
फेसबुक लाईव्हमधील मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे मुद्दे
- आरेचे कारशेड आता कांजूरमार्ग इथं होणार
- १०० कोटी रूपये आरेत खर्च झालेत, ते वाया जावू देणार नाही
- कांजूर जागेसाठी १ रूपया खर्च होणार नाही
- मेट्रो 3 आणि मेट्रो 6 चा मार्गावरील एक समान मार्ग असेल, कांजूरमार्ग कार शेडसाठी
पर्यावरणवादींवर दाखल केलेले सगळे आरोप सरकार मागे घेत आहे. आरे जंगलाची व्याप्ती ६०० एकरपासून ८०० एकर झाली आहे. कोणावरही अन्याय न करता शहरात आरेत ८०० एकर जंगल तयार करण्यात आलं आहे. आरेत कारशेड होणार नसून आता कांजुरमार्गला होणार नाही. कांजुरची जागा सरकारची असून ती शून्य किंमतीत कारशेडला देण्यात आली आहे. शनिवारी याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.