मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर गैरसमज पसरवणारे व्हीडिओ टाकणाऱ्यांना इशारा दिला आहे. व्हायरस हा जात धर्म पाहत नाही. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील एकी कायम राहणे गरजेचे आहे. काही समाज विघातक चुकीचे, खोटे, गैरसमज पसरवणारे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. ते कायद्याच्या कचाट्यातून कधीही सुटणार नाहीत. असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आज राज्याच्या जनतेशी संवाद साधताना दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिरेक्यासारखं कोरोनाचं लक्ष मुंबईवर आहे. त्यामुळे यावर इलाज म्हणजे नाईलाज म्हणून घरी राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे. कोरोनावर घरात राहणं हाच उपाय आहे. जिल्ह्यात आरोग्य सेवा वाढवतोय आहेत. पुढच्या सूचना येईपर्यंत कोणत्याही धार्मिक, सामाजिक, क्रीडा कार्यक्रमास परवानगी नाही. फेक व्हिडिओ पाठवून वातावरण दूषित करु ना. कोणत्याही प्रकारे एकीला गालबोट लागल्यास कायद्याच्या कचाट्यातून कोणीही वाचणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले.


मुंबईत कोविडसाठी स्वतंत्र रुग्णालयं आहेत. कोरोनाची लक्षण आढळल्यास दुसऱ्या कोणत्याही रुग्णायलात जाऊ नका. धूळ, अॅलर्जीपासून स्वत:ची काळजी घ्या. सिंगापूर पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आपणही, बाहेर जाताना मास्क घालावा. बाहेर जाणार असाल तर मास्क लावा. मास्कमुळे इतरांना धोका होणं टळेल. वर्क फ्रॉम होम करा, बाहेर जाऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.


तसंच मरकजहून आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं असल्याचंही ते म्हणाले. संपूर्ण जनतेवर विश्वास आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनाला हरवू. हा संयमाचा खेळ आहे, त्यावर आपण सर्वजण मिळून मात करु असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.