दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकरही उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'याचिका घटनापीठाकडे पाठवताना अनपेक्षितपणे आरक्षणाला स्थगिती दिली. आज विरोधी पक्षनेत्यांनी आपण सरकारसोबत आहोत, असं आश्वासन दिलं आहे. यात कोणतंही राजकारण नाही. सर्व पक्ष एकत्र आहेत. आरक्षण स्थगिती असताना मराठा विद्यार्थ्यांना काय दिलासा द्यायचा याबाबत चर्चा झाली,' असं मुख्यमंत्री म्हणाले.


'मराठा आरक्षणावर राज्य सरकारकडे तीन पर्याय', सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीसांचं वक्तव्य


'पर्याय कोणता, यावर मी नंतर बोलणार. आम्ही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली. इतर घटकांशीही चर्चा करायची आहे. आंदोलन करु नका, मी पुन्हा आवाहन करतो,' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.