मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु असलेल्या आरे मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्याचा निर्णय़ कॅबिनेट बैठकीत घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली. 'रातोरात झालेली कत्तल मान्य नाही. आरेमधील एकही पान तोडू दिलं जाणार नाही.' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. भाजप सरकारच्या काळातील या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोख लावली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामाला विरोध नसल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारताच मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी लगेचच काही मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचं आता दिसतं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा वादाचा विषय बनला होता. भाजपसोबत सत्तेत असताना देखील शिवसेनेने मागच्या सरकारमध्ये याला खुला विरोध केला होता. पण तरी देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे कारशेडमध्ये झाडं कापण्याचा निर्णय घेतला होता. एका रात्रीत ही झाडं कापल्यामुळे शिवसेना यावर चांगलीच आक्रमक झाली होती.


या धाडसी निर्णयानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी कोणते धाडसी निर्णय घेतात. याबाबत संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आता उत्सुकता आहे.


महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधीमंडळातील पत्रकारांसोबत चर्चा केली. त्यांनी म्हटलं की, 'आज मला तुमच्यासोबत बोलून फार आनंद होत आहे. आपलं नातं तेव्हापासून कायम आहे. जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. मी असा मुख्यमंत्री आहे, ज्याची कोणाला आशा ही नव्हती. माझा कुटुंबातून कोणीच सरकारमध्ये काम केलं नाही. मी आतापर्यंत फक्त 2 ते 3 वेळा मंत्रालयात आलो आहे. इतक्या वर्षांमध्ये ही महाराष्ट्राची स्थिती तशीच आहे. जेव्हा कोणता पत्रकार कोणत्या व्यक्तीवर टीका करतो तर त्याने त्याचा विचार केला पाहिजे असं माझे आजोबा सांगायचे.'