मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या पॅकजची घोषणा, राज्यात भाजपने केलेली पॅकजची मागणी आणि राज्यातल्या राजकारणावर निशाणा साधला. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत बरीच पॅकेज देण्यात आली, पण पोहोचली किती? लाखो कोटींच्या पॅकेजची घोषणा होते. दिसायला हे पॅकेज चांगलं दिसतं, पण आत काहीच नसतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांच्या पॅकेजवर अप्रत्यक्ष टोला मारला. तसंच केंद्राकडून येणारा निधी अजून आलेला नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 

राज्यामध्ये विरोधी पक्ष असलेला भाजपही पॅकेजची मागणी करत आहे, पण भाजपच्या पॅकेजची ही मागणी मुख्यमंत्र्यांनी धुडकावून लावली आहे. फक्त पॅकेज देऊन भागणार नाही, पॅकेजपेक्षाही प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. रेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना धान्य दिलं, शिवभोजनच्या माध्यमातूनही भोजन देत आहोत. आरोग्य सुविधा देत आहोत. तसंच लाखो मजुरांच्या खाण्याची सोय केली, तसंच अनेक मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवलं, हे पॅकेजपेक्षा कमी नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच महाविकासआघाडी पोकळ आश्वासनं देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. 

कोरोनाला रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याच्या आरोप करत भाजपने आंदोलन केलं, यावरही मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. कोणीही राजकारण करू नये तुम्ही राजकारण केलंत म्हणून आम्ही राजकारण करणार नाही. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. तुम्ही काहीही बोला, आम्ही प्रामणिकपणे काम करतोय, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. 

फक्त राजकारण म्हणून राजकारण करायचं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेसे नाही आहे. मी महाराष्ट्र जपतो, महाराष्ट्राची संस्कृती जपतो, महाराष्ट्राचे संस्कार जपतो म्हणून माझ्या संस्कारात या अडचणीच्या वेळेला राजकारण करणे बसत नाही, मी राजकारण करणार नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या पॅकजची घोषणा, राज्यात भाजपने केलेली पॅकजची मागणी आणि राज्यातल्या राजकारणावर निशाणा साधला. 

आतापर्यंत बरीच पॅकेज देण्यात आली, पण पोहोचली किती? लाखो कोटींच्या पॅकेजची घोषणा होते. दिसायला हे पॅकेज चांगलं दिसतं, पण आत काहीच नसतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांच्या पॅकेजवर अप्रत्यक्ष टोला मारला. तसंच केंद्राकडून येणारा निधी अजून आलेला नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 

राज्यामध्ये विरोधी पक्ष असलेला भाजपही पॅकेजची मागणी करत आहे, पण भाजपच्या पॅकेजची ही मागणी मुख्यमंत्र्यांनी धुडकावून लावली आहे. फक्त पॅकेज देऊन भागणार नाही, पॅकेजपेक्षाही प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. रेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना धान्य दिलं, शिवभोजनच्या माध्यमातूनही भोजन देत आहोत. आरोग्य सुविधा देत आहोत. तसंच लाखो मजुरांच्या खाण्याची सोय केली, तसंच अनेक मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवलं, हे पॅकेजपेक्षा कमी नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच महाविकासआघाडी पोकळ आश्वासनं देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. 

कोरोनाला रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याच्या आरोप करत भाजपने आंदोलन केलं, यावरही मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. कोणीही राजकारण करू नये तुम्ही राजकारण केलंत म्हणून आम्ही राजकारण करणार नाही. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. तुम्ही काहीही बोला, आम्ही प्रामणिकपणे काम करतोय, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. 

फक्त राजकारण म्हणून राजकारण करायचं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेसे नाही आहे. मी महाराष्ट्र जपतो, महाराष्ट्राची संस्कृती जपतो, महाराष्ट्राचे संस्कार जपतो म्हणून माझ्या संस्कारात या अडचणीच्या वेळेला राजकारण करणे बसत नाही, मी राजकारण करणार नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.