मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. दरम्यान राज्यात ऑक्सिजन पुरवठा आणि रेम़डेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढतेय. या आणि अशा अनेक मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात टेस्टिंगची संख्या वाढत असून 30 एप्रिलपर्यंत कोरोना एक्टीव्ह रुग्णसंख्या 11.9 लाखापर्यंत जाऊ शकते. राज्यात सध्या 5.64 लाख एक्टीव्ह केस आहेत. राज्यातील रुग्णालयात लिक्विड मेडीकल ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय. एप्रिल अखेरपर्यंत दर दिवसाला 200MT ऑक्सिजन पुरवठ्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. 


रेमडीसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीव बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. दरम्यान देशांतर्ग बाजारात रेमडीसीवर इंजेक्शन विक्रीला परवानगी द्यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलीय. 



कोरोना काळात जनतेला दिलासा मिळण्यासाठी राज्याने अनेक पाऊलं उचलली आहेत. याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली.  


छोट्या आणि मध्यम कर दात्यांसाठी जीएसटी परतावा देण्याची मार्च-एप्रिलचा कालावधी तीन महिन्यांनी वाढवण्यात आलाय. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मिनी लॉकडाऊन गरजेचा होता. अंत्योदय अन्न योजना आणि प्रायोरिटी हाऊस होल्ड अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना सहकार्य केलं जातंय. छोटे व्यावसायिकांनी घेतलेल्या कर्जाचा सुरुवातीचा हफ्ता फेडताना त्यांना व्याजातून दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रातून करण्यात आलीय.