मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं. यानंतर अनलॉक करण्यात आलं. याकाळात लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरता सुरू करण्यात आली. मात्र यामध्ये सामान्यांना प्रवास करण्यास परवानगी नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्यांसाठी कधी रेल्वे सेवा सुरु करणार? या सामान्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. लवकरात लवकर लोकल सेवा सामान्यांसाठी सुरू करणार आहेत. मात्र याबाबत लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा विचार केला जात आहे. लोकलच्या फेऱ्या वाढवून कोरोनाच्या काळात सामान्य प्रवास करू शकतात. याबाबत निर्णय झाल्यावर लोकल सेवा सुरू करणार असल्याचं सांगितलं. 



त्याचप्रमाणे मास्क वापरा. नाक आणि तोंड झाकून राहिलं अशा मास्कचा वापर करा. कोरोनाच्या काळात सगळ्यांनी सर्व नियम काटेकोरपणे पाळा.