CNG-PNG Price Hike : वाढत्या महागाईने (Inflation) सर्वसामान्य लोकांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) एका महिन्यात सलग दुसऱ्यांदा CNG आणि PNG च्या दरात वाढ झाली आहे. CNG च्या दरात तब्बल 3.50 रुपये तर PNG च्या दरात 1.50 रुपयांची वाढ झाली आहे. नवे दर तात्काळ लागू करण्यात आले आहेत. CNG आणि PNG च्या वाढलेल्या दरांमुळे मुंबईकरांना चांगलाच झटका बसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुंबईत 3 ऑक्टोबरला CNG चे दर 86 रुपये किलो इतके होते. तर PNG चे दर 52.50 प्रति SCM इतके होते. यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नव्या दरानुसार CNG चे दर 89.50 रुपये प्रति किलो इतके झाले आहेत. तर PNG चे 54 रुपये इतके झाले आहेत. वाढलेल्या दराचे परिणाम पब्लिक ट्रान्सपोर्टवरही (Public Transport) होऊ शकतो.  पब्लिक ट्रान्सपोर्टचे दरही वाढू शकतात. महामागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचं बजेट (Budget) कोलमडलं आहे, त्यात आता पुन्हा CNG-PNG दरात वाढ झाली आहे. 


सरकार करत दर निश्चित
केंद्र सरकार (Central Government) वर्षातून दोन वेळा नॅचरल गॅसच्या किंमतीत बदल करतात. मार्च आणि एप्रिलमध्ये नवे दर निश्चित केले जातात. पण आता ही परंपरा मोडीत निघाली आहे. सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सलग दोन वेळा  CNG-PNG च्या दरात वाढ केली आहे.