नववर्षात मुंबई-ठाणेकरांचे टॅक्सी-रिक्षाचे वांदे, पंपचालक मोठ्या निर्णयाच्या तयारीत
मुंबई, ठाण्यातील सीएनजी पंप चालकांनी 4 जानेवारीपासून बेमुदत बंद पुकारलाय.
मुंबई : मुंबई, ठाण्यातील सीएनजी पंप चालकांनी 4 जानेवारीपासून बेमुदत बंद पुकारलाय. त्याचा मोठा परिणाम वाहतुकीवर होणारेय. आधीच सर्वसामान्यांसाठी लोकल बंद आहेत. त्यात आता सीएनजी पंपचालकांनी बंद पुकारल्यामुळे मुंबई-ठाणेकरांचे टॅक्सी-रिक्षाचेही वांदे होणारेत.
युनायटेड सीएनजी डिलर्स असोसिएशननं पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. पंपासाठी स्वतःची जमीन आणि यंत्रणा उभारण्यासाठी पदरचे पैसे खर्ची घालणाऱ्या पंपचालकांवर नवी पॉलिसी लादून जमिनीसह त्यांचा पंपच ताब्यात घेण्याचा महानगर गॅसचा डाव असल्याचा आरोप सीएनजी डिलर्स असोसिएशनं केलाय.
पेट्रोल-डिझेलच्या दरांत 48 दिवस बदल झाले नव्हते. त्यानंतर 20 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ होण्यास सुरूवात झाली. सांगायचं झालं तर मार्चमध्ये पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात करण्यात आली.
तेव्हा तेल कंपन्यांनी तब्बल 82 दिवस दरांत कोणतेही बदल केले नव्हते. आज सलग २४व्या दिवशी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 83.81 रूपये लिटर आहे. तर मुंबईमध्ये ग्राहकांना 1 लिटर पेट्रोलसाठी 90.34 रूपये मोजावे लागत आहेत.
4 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर
दिल्ली 83.71
मुंबई 90.34
कोलकाता 85.19
चेन्नई 86.51
4 मेट्रो शहरांमधील डिझेलचे दर
दिल्ली 73.87
मुंबई 80.51
कोलकाता 77.44
चेन्नई 79.81
पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.
बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.