मुंबई : मुंबईकर आज सलग तिसऱ्या दिवशी गारेगार थंडीचा आनंद घेत आहेत. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे मुंबई गारठली आहे. सकाळच्या वेळेचं तापमान १६ सेल्सियस अंशावर गेलं आहे. फेब्रुवारी महिन्यातील मुंबईतील दुसऱ्या निचांकी तापमानाची नोंदही करण्यात आली. २०१२ साली मुंबईत ८.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर मुंबईत यावेळी १२.४ अंश से. इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं आहे. पुढील २४ तासांत मुंबईसह महाराष्ट्रात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीमध्ये मागील 2 दिवसानंतर पुन्हा थंडी वाढली आहे. पुढच्या 2 दिवसात आणखी थंडी वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासात अरुणाचल प्रदेश, उत्तर बंगाल, आसाम, बिहार, मेघालयमध्ये पावसाची शक्यता आहे. 11 आणि 13 फेब्रुवारी दरम्यान हिमाचलमध्ये बर्फवृष्टीची शक्यता आहे.



धुक्यांमुळे दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. विमान वाहतुकीवर देखाल याचा परिणाम पाहायला मिळता आहे. दरवर्षी वाढणारी थंडी आणि उष्णता हे ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्याचा इशारा देत आहे.