दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई: राज्यात लवकरच महाविद्यालयीन निवडणुकांचा रणसंग्राम सुरु होणार आहे. येत्या १७ जुलैला राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरु, प्र-कुलगुरु, महाविद्यालयांचे प्राचार्य, राज्य निवडणूक आयोग यांची महत्वाची बैठक होणार आहे. ही निवडणूक दोन फे-यांमध्ये होईल. पहिली फेरी ऑगस्ट तर दुसरी फेरी सप्टेंबरपर्यंत होणार आहे. ३० जुलैपर्यंत सर्व विद्यापीठांना आपले वेळापत्रक देण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कशा होतील महाविद्यालयीन निवडणुका? 


येत्या १७ जुलैला महाविद्यालीयन निवडणूकांसाठी सर्व विद्यापीठांचे कुलगुरु, प्र-कुलगुरु, प्राचार्य, निवडणूक आयोगाची बैठक


महाविद्यालयाचे प्रतिनिधी, विद्यार्थी समिती अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागासवर्गीय प्रतिनीधी अशा पाच पदांसाठी निवडणूक होईल. 


सर्वप्रथम पहिल्या फेरीत महाविद्यालयीन स्तरावर हे पाच प्रतिनिधी विद्यार्थी निवडून देतील. 


दुसऱ्या फेरीत त्या त्या महाविद्यालयांमधून निवडून आलेले विद्यार्थी विद्यापीठाच्या विद्यार्थी समिती अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनीधी, मागासवर्गीय प्रतिनीधी या चार पदांसाठी मतदान करतील.


बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान होणार.