मुंबई : महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा व्हाव्यात असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचं भविष्य ठरवण्याची ताकद तरुणांमध्ये आहे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असेही ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांना प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असला पाहिजे, या निवडणुका घेण्याबाबत सरकारनं पावलं उचलावीत असे आवाहनही त्यांनी सरकारला केले. सुरुवातीला 5 वर्ष अभ्यास करून सदनात गलो मग सत्तेतच संधी मिळाली, त्यानंतर विरोधीपक्ष नेते म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राजकारणात चढ उतार येत असतात, पराभव झाला तर नाउमेद होऊ नये, पुन्हा जिंकण्यासाठी सज्ज व्हावं असे त्यांनी तरुणांना उद्देशून सांगितले. 


हा आगळा वेगळा कार्यक्रम, संवाद साधण्यासाठी आलो, मनापासून आनंद, तुमची पीढी आणि माझी पीढी याच किती अंतर हे जाणून घ्यायचंय. वय ८० झालं पण विचार पद्धती जूनी नसल्याचे ते म्हणाले. २२ फेब्रुवारी रोजी ५२ वर्षांपुर्वी याच दिवशी मी विधानसभेवर आमदार झालो होतो अशी आठवणही त्यांनी करुन दिली. ५० वर्षात अनेक घटना घडल्या, अनेक संधी मिळाल्या...
कानाकोपर्यात जाऊन युवकांशी संपर्क साधण्याची संधी मिळाली मला मिळाली हे भाग्याचं असल्याचे ते म्हणाले. मी अभ्यास सोडून सगळ्यात पारंगत होतो, खेळ, निवडणूक, व्याख्यान आयोजित करणे यात पुढे होतो. साचेबंद अभ्यासक्रमातून बाहेर पडलं पाहिजे, आव्हान पेलण्याची आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा असा अभ्यासक्रम असावा अशी गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.