कर्नल प्रसाद पुरोहित यांची तळोजा तुरुंगातून सुटका
मालेगाव स्फोटातले आरोपी कर्नल प्रसाद पुरोहितला जामीन मंजूर झाल्यावर त्याची तळोजा तुरुंगातून सुटका झाली आहे. लष्कराच्या गाडीतून कर्नल पुरोहितची लष्कराच्या कुलाब्यातल्या लष्कारच्या कार्यालयात नेण्यात येत आहे.
मुंबई : मालेगाव स्फोटातले आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांना जामीन मंजूर झाल्यावर त्यांची तळोजा तुरुंगातून सुटका झाली आहे. लष्कराच्या गाडीतून कर्नल पुरोहित यांना लष्कराच्या कुलाब्यातल्या लष्कारच्या कार्यालयात नेण्यात येत आहे.
पुरोहित सध्या एक निलंबित अधिकारी आहेत. त्यामुळे आता तुरुंगातून सुटल्यावर एका विशिष्ट प्रक्रियेतून जावं लागतं. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी त्यांना या प्रक्रियेची माहिती देणार आहेत. त्यानंतरच त्यांना आपल्या घरी जाता येणार आहे. पुरोहितच्या सुटकेच्यावेळी त्यांचे कुटुंबिय सुद्धा तळोजा तुरुंगात उपस्थित होते.