मेघा कुचिक, मुंबई : सध्या विविधरंगी सुंदर हत्ती मुंबईकरांचं लक्ष वेधून घेत आहेत. अर्थातच हे खरे हत्ती नसून हत्तीचं प्रदर्शन आहे. एलिफन्ट फॅमिली संस्थेतर्फे आशिया खंडातल्या हत्तींची घटती संख्या रोखण्यासाठी आणि त्यांचं योग्य जतन होण्यासाठी एलिफंट परेड हा उपक्रम जगभरात राबवला जात आहे.


असे सजवले गेले होते हत्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुणी दागिण्यांनी मढलेले, कुणी आरश्यांनी सजलेले, कुणी पानाफुलांच्या चित्रांनी सजलेले, कुणी अनोखी नक्षी परिधान केलेले हे हत्ती जाणा-या येणा-याला आपल्याकडे आकर्षित करताहेत. 


या हत्तींची होणार ऑनलाईन विक्री


जगभरातील २४ देशांमधील हत्तींची संख्या रोडावत आहे. त्यामुळे हत्ती वाचवण्याचा संदेश देण्यासाठी एलिफंट परेड होत आहे. भारतात असा उपक्रप प्रथमच होत आहे. प्रदर्शनानंतर त्यांची ऑनलाईन विक्री केली जाईल. त्यातून मिळणारा निधी हत्तींच्या संवर्धनासाठी वापरला जाईल.


सेलिब्रिटीनी सजवेलत हत्ती


विशेष म्हणजे या प्रदर्शनात सिनेअभिनेता शाहरुख खान, सुझैन खानसारख्या सेलिब्रिटीजनीही स्वत: सजवलेले हत्ती ठेवलेत. कलात्मकतेचा हा अनोखा अविष्कार पाहण्यासाठी मुंबईकर गर्दी करत आहेत. अजून काही दिवस मुंबईतील ठराविक ठिकाणी ही एलिफंट परेड नागरिकांचं मनोरंजन करणार आहे.